कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवेल; मनसेचा भास्कर जाधवांना इशारा
आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच एका महिलेल्या केलेल्या दमदाटीमुळे आता राजकीय वातावरण चांगलच तापलं असून, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवेल असं मनसेनं आ. भास्कर जाधव यांना म्हटलं आहे.
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीमुळे आता राजकीय वातावरण चांगलच तापलं असून , याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. आ. भास्कर जाधव यांच्या दमदाटीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि विशेष करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलं आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं , कोकणी माणूस आ.भास्कर जाधवांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं आहे.
अतिवृष्टीमुळे कोकणवासियांना सर्वाधिक फटका बसला आहे. चिपळूण येथे पुराचं पाणी ओसरल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक जनता आणि व्यापाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान महापूरामुळे घरांचे आणि व्यवसायाचे मोठे नुकसान झाल्याने चिपळूणमधील एक महिला आपली व्यथा मांडली या महिलेला अश्रू अनावर झाले, दरम्यान यावेळी ही महिला आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडत होती. त्याचवेळी आ.भास्कर जाधव यांनी तिला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर याप्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे.
#मूर्ख_भास्कर_जाधव @ThakareShalini#राजसाहेब_ठाकरे #राजठाकरे#अमित_ठाकरे #शालिनीठाकरे #मनसे #महाराष्ट्र_नवनिर्माण_सेना #महाराष्ट्र 🚩🚩#RajThackeray #RajSaheb_Thackeray #AmitThackeray#shaliniThackeray #MNS #Manse #Maharashtra_Navnirman_sena#Maharashtra 🚩🚩 #DigitalManse pic.twitter.com/hFquaJN0qc
— DigitalManse (@DigitalManse) July 25, 2021
मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडतांना महिलेला अश्रू अनावर
"तुम्ही काहीपण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा, पण आमचं नुकसान भरून द्या" असं ही महिला मुख्यमंत्र्यांना सांगत होती. त्याचवेळी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी महिलेला प्रत्युत्तर दिलं, "हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला चला…बाकी काय… तुझा मुलगा कुठंय? अरे आईला समजव…आईला समजव…उद्या ये", असं आ. जाधव यांनी म्हटलं. दरम्यान त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विरोधक चांगलेच संतापले. सरकार म्हणून पूर बाधितांच्या भावना समजून घेण्याची गरज असतांना सत्ताधारी जर वागत असतील तर ते चुकीच आहे. भास्कर जाधव ज्या पध्दतीने त्या महिलेवर आवाज चढवून बोलले हे निषेधार्य आहे अशी प्रतिक्रिया विरोधकांमधून येत आहे. यावर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिला आहे. "भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उघारलाय ना…? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही," असं शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.