मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून मनसेचे आंदोलन
X
दहिसर : राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यांवर भाजप नंतर आता मनसे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडाभरावर गणेशोत्सव पोहोचला असताना महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकार अजूनही मंदिर उघडण्याचे जाहीर करत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दहिसर पश्चिम येथील गणपती मंदिराच्या बाहेर आरती करून निदर्शनं करण्यात आली.
यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांना न जुमानता त्यानी आरती संपूर्ण केली त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सोबतच राज्य सरकारने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, तातडीने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घ्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.