Home > News Update > पाली शहरातील धोकादायक अवैध अवजड वाहतूक बंद करण्यासाठी मनसेचा जन आक्रोश मोर्चा

पाली शहरातील धोकादायक अवैध अवजड वाहतूक बंद करण्यासाठी मनसेचा जन आक्रोश मोर्चा

X

महाराष्ट्रातील अष्टविनायक तिर्थक्षेत्रांपैकी धार्मिक व प्रख्यात स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुधागड पाली शहराला एक ना अनेक समस्यांचा विळखा बसला आहे. त्यामुळे पालीकर नागरिक मूलभूत व नागरी सेवा सुविधांपासून वंचित असल्याचे दिसते.अशातच पालीतील अवैद्य व अवजड वाहतूक सर्वात गंभीर समस्या बनली आहे.

अवैध वाहतूक बंद व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात बल्लाळेश्वर मंदिर ते तहसीलदार कार्यालय असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पाली शहरातून होणारी अवैद्य व अवजड वाहतूक, जीवघेणी ठरत आहे. यासाठी जन आक्रोशआंदोलन करण्यात आले.येत्या आठ दिवसात पाली शहरातील अवैध्य वाहतूक बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर व महिला जिल्हा सचिव लता कळंबे यांनी दिला.

यावेळी पाली तहसीलदार उत्तम कुंभार यांना निवेदन देण्यात आले.


Updated : 25 Nov 2022 5:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top