Home > News Update > गेवराईमध्ये विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक

गेवराईमध्ये विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक

गेवराईमध्ये विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक
X

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे विविध मागण्यांसाठी मनसे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्यासह मनसैनिकांकडुन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

एकीकडे शेतकरी हा हवालदील झाला असुन त्याने पिकविलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. सद्य स्थितीततर टाॅमेटोच्या भावाचा विचार न केलेलाच बरा असे असतानाच जिल्ह्यामध्ये पीकं कशीबशी तग धरून होती. मात्र अतिवृष्टीने त्यांचेही नुकसान झाले. अशावेळी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्याकरिता पालकमंत्र्यांनी दौरा केला आणि त्यात केवळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले ठोस अशी घोषणा केली नाही म्हणून पालकमंत्र्यांचा हा दौरा वांझोटा असल्याचा आरोप मनसे ने केला आहे.

तर दुसरीकडे शाळा उघडण्याच्या मागणीवरून ही मनसे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले राजकीय कार्यक्रम , नेत्यांचे दौरे , मोठ मोठ्या यात्रा संपुर्ण महाराष्ट्रात सुरू आहे मग शाळा उघडण्यास कोरोना कसा आडवा येतो असा प्रश्न उपस्थित करत हे सरकार राज्यामध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणांना वेठबिगार निर्माण करण्याचे काम करत असल्याचे सांगत लवकर शाळा उघडाव्यात नाहीतर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Updated : 4 Sept 2021 12:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top