शिवसेना भवन पुढे मनसेचे भोंगे
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यावरून राज्य सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या भूमिकेवर राज्यभरातून टीका झाली. त्यामुळे मनसेने मशिदींसमोर नाही तर शिवसेना भवन पुढे भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण केले आहे.
X
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात शिवसेना, राष्ट्रवादीवर सडकून टीका केली होती. त्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, मशिदींवर लावलेले भोंगे काढले नाही तर त्यासमोर त्या भोंग्यांच्या आवाजापेक्षा मोठ्या आवाजात भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यभरातून राज ठाकरे यांच्या भुमिकेवर सडकून टीका करण्यात आली होती.
राज ठाकरेंच्या भुमिकेवर झालेल्या टीकेनंतर आता राज ठाकरे यांनी पुन्हा एक उत्तर सभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये त्यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देण्यात येणार होते. त्यातच आता राम नवमीच्या निमीत्ताने मनसेने शिवसेना भवनपुढे भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण केले. त्यामुळे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेकडून सध्या हिंदूत्व बासनात गुंडाळून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना देखील जाग यावी, यासाठी शिवसेना भवनपुढे भोंगा लावण्यात आल्याचे मत यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यामध्ये यशवंत किल्लेदार म्हणाले, ज्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपले हिंदूत्व सोडून दिले. बाळासाहेब ठाकरे यांची पुर्ण हयात ज्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विरोध करण्यात गेली. त्यांच्यासोबत शिवसेना सत्तेत जाऊन बसली आहे. त्यामुळे त्यांना संदेश देऊ इच्छितो की, सत्तेसाठी जी लाचारी पत्करली आहे ती सोडून देश आणि धर्मासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूयात, असे यशवंत किल्लेदार म्हणाले.
मनसेने शिवसेना भवनपुढे भोंगा लावल्याने हा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्यातच मनसेने शिवसेना भवनपुढे भोंगे लावल्याने पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
शिवसेना भवनासमोर भोंगा लावून मनसेकडून हनुमान चालीसा पठण! pic.twitter.com/OaTZsjNzh0
— Pravin Wadnere (@pravinwadnere) April 10, 2022