मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीची दखल ; पाटोदा तालुक्यातील शिंदे वस्तीच्या जल प्रवासाची आमदारांनी घेतली दखल !
सौताडा गावातील शिंदे वस्ती येथे गेली 21 वर्षापूर्वी विंचरणा नदीवरील धरणामुळे शिंदे वस्तीकरांचा जल प्रवास करावा लागत होता याबाबत मॅक्स महाराष्ट्रने बातमी प्रकाशित करताच या बातमीची आमदार आजबे यांनी दखल घेतली आहे
X
पाटोदा तालुक्यातील सौताडा गावातील शिंदे वस्ती येथे गेली 21 वर्षापूर्वी विंचरणा नदीवर एक धरण बांधण्यात आलं आणि याच धरणामुळे शिंदे वस्तीकरांचा जल प्रवास सुरू झाला. आजही शिंदे वस्तीकराना पाण्यातूनच प्रवास करावा लागतो. अनेक वेळा निवडणुका झाल्या, अनेक वेळा मागण्या झाल्या, निवेदनं दिली गेली. मात्र, शिंदे वस्तीचा प्रश्न जैसे थे राहीला. याबाबत मॅक्स महाराष्ट्रने बातमी करताच स्थानिक आमदार बाळासाहेब आजबे यांनी दखल घेतली आहे.
आमदार आजबे यांनी शिंदे वस्तीची आणि रस्त्याची पाहणी करून तात्काळ हा रस्ता तयार करून देऊ असं आश्वासन दिलं आहे. आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आश्वासन दिले आहे. दरम्यान मॅक्स महाराष्ट्र ने बातमी लावताच आमदारांनी दखल घेतल्याने शिंदे वस्तीकरांनी मॅक्स महाराष्ट्रचे आभार मानले आहेत.
दरम्यान आमदार आजबे यांनी निवडणुकी वेळीही रस्ता बनवून देण्याची आश्वासन दिलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांना याचा विसर पडला असं नागरिकांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता दिलेलं आश्वासन आमदार आजबे पाळतात का? याबाबत पुढील काळात मॅक्स महाराष्ट्र पाठपुरावा करत राहील.