Home > News Update > आर्यन खान प्रकरणातून वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पहा ; आ. विनायक मेटेंचा राज्य सरकारवर निशाणा

आर्यन खान प्रकरणातून वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पहा ; आ. विनायक मेटेंचा राज्य सरकारवर निशाणा

आर्यन खान प्रकरणातून वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पहा ; आ. विनायक मेटेंचा राज्य सरकारवर निशाणा
X

बीड : आर्यन खानच्या सुटकेनंतर आता वेळ मिळाला तर राज्यातील शेतकऱ्यांकडे पहा असा खोचक टोला शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. बीड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विनायक मेटे बोलत होते.

बीड जिल्ह्यात केवळ दहा महिन्यातच 159 आत्महत्या झाल्या असून प्रशासनासाठी ही लाजिरवाणी बाबा आहे. प्रशासनाने किती आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन चौकशी केली? असा सवाल देखील मेटे यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान दिवाळीनंतर शिवसंग्राम रस्त्यावर उतरणार असून हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही. असा इशारा देखील मेटे यांनी दिला.

यावेळी बोलताना आमदार मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना म्हणाले की, आर्यन खान बाहेर आला, मंत्री नवाब मलिक यांचे जावई बाहेर आले आता त्यातून वेळ मिळाला तर जरा आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल याकडे लक्ष द्या,सोबतच जिल्ह्यात राज्यात जे अवैध धंदे सुरू आहेत त्याला कुठेतरी चाप लावा.जे क्लब सुरू आहेत , ज्यातून लाखो करोडोंची लूट सुरू आहे तुमच्या राज्यात बाळासाहेबांच्या वारसाच्या राज्यात ती जरा थांबवा असा घणाघात आमदार मेटे केला.

Updated : 30 Oct 2021 8:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top