'ब्रेड मिळत नाही तर केक खा' ; इंधन दरवाढीवरून आमदार रोहित पवार यांची केंद्रावर टीका
X
अहमदनगर : देशातील वाढत्या पेट्रोल-डिझेल दरावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकरावर जोरदार टीका केली आहे. रविवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत सलग चौथ्या दिवशी लिटरमागे 35 पैशांची वाढ झाल्यामुळे देशभरात हे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.त्यातच विमानाच्या इंधनापेक्षाही बाईक, गाड्यांचं इंधन महाग झाल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर मिश्किल शब्दात टीका केली.
आमदार रोहित पवार यांनी ट्विट करता "विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणारं पेट्रोल-डिझेल महाग, अशा बातम्या आज बघायला मिळाल्या. त्यामुळे 'ब्रेड मिळत नाही तर केक खा' असं सांगणाऱ्या फ्रान्सच्या राणीची गोष्ट आठवली! आता सामान्य लोकांनी विमानाचा प्रवास करावा', असं भाजपाच्या लोकांनी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको!" असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.
'विमानाच्या इंधनापेक्षा लोकांना मिळणारं पेट्रोल-डिझेल महाग' अशा बातम्या आज बघायला मिळाल्या आणि 'ब्रेड मिळत नाही तर केक खा' असं सांगणाऱ्या फ्रान्सच्या राणीची गोष्ट आठवली!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 18, 2021
'आता सामान्य लोकांनी विमानाचा प्रवास करावा', असं भाजपच्या लोकांनी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको!
रविवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ करण्यात आले, सोमवारी इंधनाचे दर तेल कंपन्यांनी स्थिर ठेवले आहे. मात्र असं असलं तरी दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांत इंधनाच्या दरांनी नवीन उच्चांक गाठला आहे.