अमरावतीच्या लॉकडाऊनचा मुद्दा अधिवेशनात
टीम मॅक्स महाराष्ट्र | 1 March 2021 2:16 PM IST
X
X
सध्या अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पण या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे.
कोणालाही विश्वासात न घेता अमरावतीमध्ये पालकमंत्र्यांनी लॉकडाऊन लावला असून अमरावतीचे लॉकडाऊन रद्द केले नाही तर आम्ही सभागृह चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर अचानक लॉकडाऊन जाहीर केले होते, यावर तुमचं मत काय? असा प्रश्न विचारला यावर रवी राणांनी काय उत्तर दिले आहे ते पाहा....
Updated : 1 March 2021 2:16 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire