पुण्यातील अपहरण प्रकरणी आमदार नितेश राणे आक्रमक
X
पुण्यातील(Pune) मुंढवा भागात कथित अपहरण प्रकरणी सकल हिंदू (hindu) समाजाच्या वतीने आज भाजपचे आमदार नितेश राणे (नितेश Rane) यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक ते जय हिंद चौक घोरपडी दरम्यान हा निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत अपहरण प्रकरणावर भुमिका मांडली.
महाराष्ट्रातल्या (Maharashtra) असंख्य हिंदू मुलींसोबत लव जिहाद प्रकरण घडत आहे. जेव्हा या घटना होतात तेव्हा पोलीस (Police) दलातले काही ठराविक अधिकारी आहेत ते लव जिहाद घडविणा-या लोकांना मदत करतात, त्यांना ताकद देतात संबधित प्रकरणातील महिलेने ही केस मोठी करू नये. त्या संबधित जिहादीवर केस टाकू नये यासाठी मदत केली आहे. त्या संदर्भात आम्ही राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्याशी बोलणार असल्याचं सांगितले. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक जिहादींना हे कळू दे की राज्याचे गृहमंत्री बदलले आहेत. असा टोलाही त्यांनी आधीच्या सरकारला लगावला.