'त्या' आमदाराची सीआयडी चौकशी करा
टीम मॅक्स महाराष्ट्र | 3 March 2021 3:59 PM IST
X
X
महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री धनंजय मुंडे आणि संजय राठोड हे अनैतिक संबंध यामुळे अडचणीत आले असताना आज विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मोठा गौप्यस्फोट करुन महाविकास आघाडीतील आणखी एका आमदाराचा पर्दाफाश केला आहे.
त्या आमदाराची डीएनए चाचणीची मागणी केली असून आमदाराची कथित पत्नी आणि त्यांच्या मुलाने एफआयआर दाखल केला आहे. तसेच त्यांना मारण्याचा कट, फोटो आणि पेटीशन सभागृहात सादर केली आहे.
ह्या आमदाराला मदत करणारा एका बिल्डरने शासनाची जागा हडप केली असून आएएस -आयपीएस बदल्यात मध्ये कोटयावधी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा दरेकर यांनी केला. उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आई आणि मुलाला संरक्षण देण्याची सूचना सरकारला केली आहे.
Updated : 3 March 2021 3:59 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire