Home > News Update > मोठी बातमी ! राज्यात लॉकडाऊन आणखी कडक होणार?

मोठी बातमी ! राज्यात लॉकडाऊन आणखी कडक होणार?

मोठी बातमी ! राज्यात लॉकडाऊन आणखी कडक होणार?
X

URL – minister vijay vadettivar hints at strict lockdown in state

HEADLINE – मोठी बातमी ! राज्यात लॉकडाऊन आणखी कडक होणार?

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यभरात निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, रुग्णसंख्या अपेक्षएवढी अशी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. तसेच त्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी कोरोना परिस्थिती आणि राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात निर्बंध लावले आहेत. मात्र, ते पुरेसे नसून, कडक लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली जात आहे. लोकांकडूनच 100 टक्के बंदची मागणी होत आहे. यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल. कडक लॉडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेतील. तसेच 'दिल्लीत कडक लॉकडाऊन करण्यात आला असून, त्याबाबत माहिती मागवल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर राज्यातही कदाचित लॉकडाऊन नियमावलीत काही बदल करण्यात येतील. राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा अपेक्षित असा फायदा होताना दिसत नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. यादरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पण आता संपूर्ण लॉकडाऊन केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तीन आठवड्यांचा लॉकडाऊन?

कोरोनाबाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाऊनने काही होणार नाही. संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला पावलं उचलणे गरजेचे आहे, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी कडक लॉकडाऊनबाबत भाष्य केले आहे.

Updated : 19 April 2021 6:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top