मंत्री उदय सामंत हे औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर ; 116 प्रकरणे काढली निकाली
X
औरंगाबाद : राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत,आज शहरात त्यांनी विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी 135 प्रकरणांपैकी 116 प्रकरणा संदर्भात आज निकाल देण्यात आला आहे. तसेच विद्यापीठातील पदभरती संदर्भात ही चर्चा करण्यात आली असून लवकरात लवकर पदभरती करण्याचे निर्देश यावेळी विद्यापीठाला देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर विद्यापीठातील नाट्यगृहांमध्ये त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली.
विद्यापीठातील विविध कामगार संघटनांशी यावेळी चर्चा करण्यात आली, त्यांच्या समस्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी विविध कर्मचारी संघटनेला सांगितले आहे. त्याचबरोबर विद्यापीठातील वस्तीगृह सुरू करण्यासंदर्भात ही चर्चा करण्यात आली आहे, तसेच विद्यापीठामध्ये एनसीसी युनिट सुरू करण्याची मान्यता देण्यात आली असून विद्यापीठात शिवभोजन झाली सुरू करण्याला ही मान्यता देण्यात आली. सदरील बैठकीला विद्यापीठातील कुलगुरू यांच्यासह सिनेट मेंबर आणि विविध पदाधिकारी यांची सदरील बैठकीला उपस्थिती होती.
उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेऊन विद्यापीठातील विविध गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे अशी माहिती विद्यापीठाच्या वतीने आज रोजी देण्यात आली आहे.