Home > News Update > महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, आठवलेंची राष्ट्रपतींकडे मागणी

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, आठवलेंची राष्ट्रपतींकडे मागणी

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, आठवलेंची राष्ट्रपतींकडे मागणी
X

नवी दिल्ली - महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था; कोरोना महामारी चा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश; राज्य सरकार वरून जनतेचा उडालेला विश्वास पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे. रामदास आठवले यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या मागणीचा विचार करू, असे आश्वासन दिलयाची माहिती रामदास आठवले यांनी दिली.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी आणि त्यानंतर झालेल्या घटनाक्रमात महाराष्ट्रच्या गृह विभागाची प्रतिमा कलंकित झाली आहे. सचिन वाझे प्रकरण; त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप; महिन्याला 100 कोटींची हफ्ता वसुली या सारख्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या गृह विभागाची प्रतिमा डागाळली त्याबरोबर जनतेत भीतीचे वातावरण आहे. जोपर्यन्त महाराष्ट्राचे राज्य सरकार बरखास्त होत नाही तोपर्यंत या गंभीर आरोपांची निष्पक्ष सखोल चौकशी होणार नाही असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Updated : 25 March 2021 1:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top