राज्यमंत्री अदिती तटकरे अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर
राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे या जिल्हा दौर्यावर आहेत.
X
अहमदनगर: राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे या जिल्हा दौर्यावर आहेत.
अदिती तटकरे या आज राहुरीतील मुथा प्लॉट येथील राहुरी शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामांच्या भूमिपुजनास उपस्थिती राहणार आहेत, त्यानंतर त्या राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे प्रक्षेत्र भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे देखील उपस्थित असणार आहेत.
त्यानंतर तटकरे या दुपारी 4.30 वाजता मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयाला भेट देऊन जिल्ह्यातील औद्योगिक सुविधा व अडचणीविषयी बैठक करणार आहेत. त्यानंतर अहमदनगर शहरातील सावेडी येथील जॉगींग ट्रॅक वरील "नवीन बास्केट बॉल कोर्टचे" देखील अदिती तटकरे उद्घाटन करतील. यावेळी मंत्री तटकरे अहमदनगर शहरातील ऐतिहासिक वास्तू संग्रहालयाला देखील भेट देणार आहेत.या ठिकाणी त्या टच फाऊंडेशन आयोजित "रिव्हीलींग दी टूथ आयडेंटिटि ऑफ अहमदनगर" या विशेष दालनाचे उद्धाटन करतील. सोबतच गवळी समाजाचे आराध्य दैवत सिधाजी आप्पा मंदिरास भेट त्या भेट देणार आहेत.
उद्या म्हणजेच रविवारी त्या जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर . राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. यावेळी त्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत मंजुर रस्त्यांच्या भूमिपुजनास देखील उपस्थिती राहतील.