नवाब मलिकांना सुप्रिम कोर्टात जामीन मिळणार?
X
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अटक केली होती.त्यांचा जामीन ही नाकारण्यात आला होता.त्यांचे वकील कपिल सिब्बल (Adv kapil sibbal)लवकरात लवकर सुनावणीची मागणी सुप्रिम कोर्टानं मान्य केली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बेनामी मालमत्ता विकत घेतल्याच्या आरोपात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. दरम्यान, विशेष पीएमएलए कोर्टानं आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली होती. आता पीएमएलए (PMLA)कायदाचा दाखला देत याप्रकरणाची लवकरात लवकर सुनावणीची मागणी सु्प्रिम कोर्टात केली आहे.
मलिक यांनी खरेदी केलेल्या काही मालमत्ता या दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या मार्फत खरेदी केल्या आहेत. या मालमतांची किंमत कोट्यवधी असून त्यामध्ये बेकायदेशीरपणे व्यवहार केले आहेत. ही रक्कम दाऊदपर्यंत पोहचविण्यात आली आहे, असा दावा ईडीच्यावतीनं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला होता.