मंत्री नवाब मलिकांची प्रकृती गंभीर, स्ट्रेचरवरुन केले रुग्णालयात दाखल
X
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि आज त्यांना स्ट्रेचरवरुन जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती नवाब मलिक यांच्या वकिसांनी विशेष पीएमएलए कोर्टात दिली.
मंत्री नवाब मलिकांना खंडणी प्रकरणात अटक झाली होती.हि अटक ईडीमार्फत(ED) करण्यात आली होती.खंडणीच्या प्रतिबंधक कायद्याच्या म्हणजेच पीएमएलए तरतुदीनुसार अटक केली होती.राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या वकिलाने विशेष न्यायालयाला माहिती दिली आहे की,मलिक गेल्या ३ दिवसांपासून आजारी आहेत.त्यांना जे जे रुग्णालयात(JJ Hospital) दाखल करण्यात आले आहे.तिथे त्यांना स्ट्रेचरवरुन नेण्यात आले आहे.६२ वर्षीय मलिक यांनी यापूर्वी न्यायायाला सांगितले होते की,किडनीच्या आजारामुळे ते आजारी आहेत आणि पायांना सूज आली आहे.
याआधी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका स्वीकारण्यास नकार दिला होता. तर पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी ६ मे पर्यंत वाढवली.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.ज्याअंतर्गत उच्च न्यायालयाने त्यांच्या तात्काळ सुटकेचा अंतरिम अर्ज फेटाळला.ईडी मलिक यांच्याविरुद्ध मनी लॉंड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे.