Home > News Update > राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेबाबत जयंत पाटील याचं मोठ विधान

राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेबाबत जयंत पाटील याचं मोठ विधान

राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेबाबत जयंत पाटील याचं मोठ विधान
X

राज्यामध्ये सुरु असणाऱ्या भोंग्यासंदर्भातील राजकारणावरुन अनेक प्रतिक्रिया उमटतं आहेत. १ मे महाराष्ट्र दिनी राज ठाकरे औरंगाबाद येथे सभा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.या सभेच्या परवानगी वरुन अनेक वाद सुरु झाले आहेत.त्यावरच आता राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी टिका केली आहे.

राज ठाकरे यांच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर ते बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले की वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम राज ठाकरे करीत आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याचे चित्र समोर येत आहे.अशा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज ठाकरे यांना परवानगी द्यायची कशी? असा प्रश्‍न पोलीस प्रशासनासमोर उभा राहतो.

महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयंत पाटील हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर ती आले असून आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की राज्यात भाजपा रडीचा डाव खेळत असून, मात्र याला महा विकास आघाडी सरकार घाबरत नाही. आणीबाणी सारखी दुरुस्ती असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न भाजपचे मंत्री आणि पदाधिकारी करीत आहे.असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यात हनुमान जयंतीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी महाआरती केली होती.त्यानंतर पत्रकार परिषद घेत १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले.त्या पत्रकार परिषदेत ५ जून रोजी आपण आयोध्याला जाणार असल्याचीही घोषणा यावेळी केली.

Updated : 24 April 2022 5:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top