जयंत पाटील यांच्या कारखान्याच्या कार्यालयाला आग...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 12 Jan 2021 1:26 PM IST
X
X
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कारखान्याच्या कार्यालयाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली आहे. जयंत पाटील यांचा राजारामबापू सहकारी कारखाना आहे. या कारखान्याच्या मिरज तालुक्यातील सावळवाडी (कारंदवाडी गट नंबर ७) या कार्यालयाला रविवारी अज्ञात लोकांनी आग लावली.
दरम्यान ऊसाच्या एक रकमी मागणीसाठी ही आग लागल्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमी मागणीसाठी सध्या आंदोलन करत आहे. मात्र, कोणत्याही संघटनेने या संदर्भात जबाबदारी स्विकारलेली नाही. या आगीत कागदपत्रे आणि फर्निचरचे नुकसान झाले आहे.
Updated : 12 Jan 2021 1:57 PM IST
Tags: jayant patil
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire