Home > News Update > 'त्या बारा आमदारांबाबत राज्यपालांनी हो किंवा नाही सांगवं'- हसन मुश्रीफ

'त्या बारा आमदारांबाबत राज्यपालांनी हो किंवा नाही सांगवं'- हसन मुश्रीफ

विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती रखडून ठेवल्यावरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. या नियुक्त्या रखडून ठेवल्याने राज्यपालांवर भाजपचा किती दबाव आहे हे स्पष्ट होते असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

त्या बारा आमदारांबाबत राज्यपालांनी हो किंवा नाही सांगवं- हसन मुश्रीफ
X

अहमदनगर : विधान परिषदेच्या 12 आमदारांची नियुक्ती रखडून ठेवण्यासाठी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर भाजपचा दबाव असल्याचा आरोप करत भाजपने राज्यपाल आणि राज्यपाल पदाची अप्रतिष्ठा करू नये असे मत राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ते अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

12 आमदारांच्या नियुक्त्या रखडून ठेवल्याने सर्वोच्च न्यायलयाने या निर्णयावर ताशेरे देखील ओढले आहेत, सर्वोच्च न्यायलयाने याबाबत आपली भुमिका मांडतांना, वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने कालमर्यादा नसलेल्या कारणाचा आश्रय घेत काहीच कृती न करण्याच्या आपल्या कृतीचा बचाव करणे हे त्या पदाला शोभून दिसत नाही असं म्हटलं असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीला निर्णय घेण्यासाठी भारतीय राज्यघटनेत कोणतीही कालमर्यादा दिलेली नाही, समाजाच्या प्रगतीचे, समाजाच्या उन्नतीचे लक्ष डोळ्यासमोर ठेऊन घटनेची निर्मीती करत असताना घटनेच्या शिल्पकाराने असा विचार केलेला नसेल भविष्यात सार्वजनिक हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देणारी मानसिकता निर्माण होऊ शकते असंही न्यायालयाने म्हटले असल्याचे मुश्रीफ यांनी बोलतांना स्पष्ट केले.

दरम्यान एका कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करतांना आमचं , देवेंद्र फडणवीस यांचे ठरलं आहे की, जोपर्यंत आमची सत्ता येत नाही तोपर्यंत या 12 आमदारांची नियुक्ती होऊच द्यायची नाही असं त्यांनी सांगितल्याचे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

म्हणूनच अमित शहा यांच्या भेटीला गेल्यानंतर त्यांना समज दिली असावी असं मला वाटतं असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. 9 महिने आमदारांची नियुक्ती थांबवून ठेवणे योग्य नाही. हवं तर राज्यपालांनी एकादा आमदार नको असेल तर आम्हाला कळवावं आम्ही दुसऱ्या आमदारांचे नाव पाठवू पण ते हो देखील म्हणत नाहीत आणि नाही देखील म्हणत नाहीत यावरून त्यांच्यावर भाजपचा किती दबाव आहे हे स्पष्ट होते असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

Updated : 15 Aug 2021 1:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top