Home > News Update > भोंगे लावणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर मोका लावा- MIM माजी आमदार आसिफ शेख

भोंगे लावणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर मोका लावा- MIM माजी आमदार आसिफ शेख

भोंगे लावणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर मोका लावा- MIM माजी आमदार आसिफ शेख
X

१ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादला झालेल्या सभेत मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे(RAJ THACKREY) यांनी भोंग्यांबाबत ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम कायम ठेवला.विविध स्तरातून त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.राज ठाकरे यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत,भाजप त्यांचा वापर करुन घेत आहेत.असा आरोप एमआयएम (MIM)आमदार मुफ्ती इस्माईल यांनी केला.

राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतर मालेगावात प्रतिक्रिया उमटल्या असून सरकार पडण्यासाठी भाजप राज ठाकरे यांचा वापर करत असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी केला.राज ठाकरे यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत ते एक मोठे नेते होते. मात्र त्यांचे अस्तित्व धोक्यात आल्यामुळे भावनिक मुद्दे उपस्थित करता असल्याचे आमदार यांनी सांगितले.

सभेत बोलताना राज ठाकरे यांनी एका प्रकारे धमकी दिली असून त्याची राज्य सरकारने दखल घ्यावी.शिवाय ४ तारखेला मशिदीसमोर भोंगे लावून वातावरण बिघडविण्याऱ्या मनसे कार्यकर्त्यावर मोका लावण्याची मागणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे.

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता ३ मे पर्यंत मुदत दिली आहे.३ तारखेला रमजान ईद आहे.मला सणात विष कालवायचे नाही.मात्र ४ मे पासून ऐकणार नाही.मात्र ४ मेपासून ऐकणार नाही.ज्या मशिदींवर भोंगे असतील,त्यांच्यसमोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा म्हणा,असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत केले.

Updated : 2 May 2022 2:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top