Home > News Update > 'सुवर्ण वेध' घेणाऱ्या मिहिरचे बुलडाण्यात जंगी स्वागत

'सुवर्ण वेध' घेणाऱ्या मिहिरचे बुलडाण्यात जंगी स्वागत

पोलमंडमध्ये पार पडलेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पीयनशीपमध्ये विजय मिळवलेल्या मिहीर अपारचे बुलडाण्यात जोरदार स्वागत करण्यात आले.

सुवर्ण वेध घेणाऱ्या मिहिरचे बुलडाण्यात जंगी स्वागत
X

बुलडाणा :पोलमंडमध्ये पार पडलेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पीयनशीपमध्ये भारताच्या अवघ्या १६ वर्षाच्या युवा खेळाडू मिहीर नितीन अपार याने अमेरिकेच्या संघाला अतितटीच्या स्पर्धेत मात देत कंपाऊंड प्रकारात सुवर्ण वेध केला. मूळच्या बुलडाण्याचा असणार मिहीरच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. मिहीर जेंव्हा बुलडाणा सुवर्ण पदक घेऊन बुलडाण्यात दाखल झाला तेंव्हा मिहीर अपारचे बुलडाण्यात जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी मिहीरची बुलडाणा शहरातून जोरदार मिरवणूक काढण्यात आली.

आपले संपूर्ण कौशल पणाला लावत मिहिरने हा सुवर्ण वेध घेतला. पोलंडमध्ये 9 ऑगस्टला युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पीयनशीप सुरू झाली . ज्यात 14 ऑगस्टला मुलांच्या संघातील हरियाणाचा कुशल दलाल, उत्तर प्रदेशच्या साहील चौधरी आणि बुलडाण्याच्या मिहीर नितीन अपार यांनी 'सुवर्ण' वेध घेत अमेरिकेच्या संघाचा 233 विरुद्ध 231 अशा फरकाने पराभव केला.

मिहीर हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षीका असलेल्या जया अपार आणि नितीन अपार यांचा मुलगा आहे.त्याच्या या यशाने केवळ बुलढाण्याचाच नाही तर संपूर्ण देशाच्या शिरपेचात एक मनाचा तुरा रोवला गेला. दरम्यान आपल्या मायभूमीत झालेल्या जंगी स्वागताने मिहीर भावूक झाला. त्याने या भव्य स्वागतासाठी बुलडाणावासियांचे आभार मानले.

Updated : 19 Aug 2021 12:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top