धक्कादायक : शालेय पोषण आहाराऐवजी मुलांना पशुखाद्याचे वाटप
X
पुणे : विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात पशुखाद्य दिले गेल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. हडपसरमधील शाळा क्रमांक ५८ मध्ये मुलांना जनावरांचे खाद्य देण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते सुनील बनकर यांनी हा प्रकार उघड केला आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह कन्झुमर फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि त्यांनी हा पशु आहार जप्त केला आहे. पण मुलांसाठी पशूखाद्य आहार म्हणून आलेत कसे असा सवाल उपस्थित झाला आहे. आलेला आहार तपाशणी न करताच का घेतला गेला, ज्यांनी पाठवला त्यांनीही तपासणी केली नाही का, असे अनेक प्रश्न पुणे शिक्षण समितीच्या अध्येक्ष मंजुश्री खर्डेकर यांना उपस्थित केला आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी बनकर यांनी केली आहे.
दरम्यान पुण्याचे महापौर मुरलधीऱ मोहोळ यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची घोषणा केली आहे. हे धान्य राज्यसरकारतर्फे देण्यात येते. महानगर पालिका फक्त ते धान्य वितरण करण्याचे काम करते, असे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांना जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी भारतीय खाद्य संरक्षण एवं मानव प्राधिकरण विभागामध्ये याची तक्रार केली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली असे त्यांनी सांगितले.