म्हाडा भरतीच्या परीक्षेची नवीन तारीख जाहीर, आता 1 ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान होणार परीक्षा
ऐन परिक्षेच्या आदल्या रात्री म्हाडा परीक्षाचा पेपर फुटला होता. त्यामुळे आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारवरने घेतला आहे. त्यानंतर आता हीच परीक्षा 1 ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
X
पुणे // ऐन परिक्षेच्या आदल्या रात्री म्हाडा परीक्षाचा पेपर फुटला होता. त्यामुळे आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारवरने घेतला आहे. त्यानंतर आता हीच परीक्षा 1 ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, यंदा ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे.
कंत्राटी एजन्सीचा संचालक प्रीतिश देशमुख हा पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असताना पुणे पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले होते. त्यामुळे 11 डिसेंबरच्या मध्यरात्री ही परीक्षा ऐनवेळी रद्द करत असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. आता ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, म्हाडा पेपरफुटी प्रकरणामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. प्रितीश देशमुख याच्यासह अन्य दोघांना अटक केली असून सर्व आरोपी सध्या कोठडमध्ये आहे. एजंट्सकडून आलेल्या परीक्षार्थींना पास करण्यासाठी मुख्य आरोपी डॉ. देशमुख यानं वेगळंच प्लॅनिंग केलं होतं. आरोपीला परीक्षार्थींकडून प्रत्येकी 10 लाख रूपये मिळणार होते असे पोलीस तपासात समोर आले होते. याप्रकरणी राज्यभरातील आणखी 10 एजंट्सची नावं समोर आली असून सायबर पोलीस त्यांचा तपास करत आहेत.