मला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न केला : संजय राठोड
टीम मॅक्स महाराष्ट्र | 28 Feb 2021 4:34 PM IST
X
X
गेली महीनाभर गाजत असलेले टिकटॉक स्टार पुजा चव्हाणच्या आत्महत्येवरुन वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर, मला मिडीया आणि विरोधकांनी राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
बंजारा समाजातील युवती पुजा चव्हाणच्या मृत्यूनंतर मला लक्ष करण्यात आले. त्यामुळ माझी, माझ्या समाजाची बदनामी झाली. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला. माझ्या तीस वर्षाच्या राजकारण संप वण्याचा प्रयत्न झाला. पोलिस चौकशी सुरु होती. आधिवेशन चालू ठेऊ देणार नाही ही विरोधकांची भुमिका संविधान विरोधी होती. समाजावर होणाऱ्या बदनामीसाठी मी राजीनामा दिला आहे. चौकशी निपक्षपणे व्हावी, अशी भुमिका संजय राठोड यांनी मांडली आहे.
Updated : 28 Feb 2021 4:35 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire