Home > News Update > यवतमाळ मध्ये 16 लाखांचा एमडी ड्रग्जचा (MD Drugs) माल जप्त

यवतमाळ मध्ये 16 लाखांचा एमडी ड्रग्जचा (MD Drugs) माल जप्त

यवतमाळ(Yavatmal) जिल्ह्यात 16 लाख रुपयाचा ड्रग्स जप्त झाला आहे. दारव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे.

यवतमाळ मध्ये 16 लाखांचा एमडी ड्रग्जचा (MD Drugs) माल जप्त
X

अंमली पदार्थ म्हणजे काय ? असा प्रश्न आपणास कोणी विचारला तर आपल्या डोळ्यासमोर गुटखा, दारू , सिगारेट यांचे चित्र येते. हे तर अमली पदार्थ आहेतच मात्र याव्यतिरीक्त देखील एक नाव प्रामुख्याने सामोरे येते ते म्हणजे (MD DRUGS ) एमडी ड्रग्ज . या एक ग्राम ड्रग्सची किंमत 1000 ते 15000 रुपयांपर्यंत असते.

यवतमाळ जिल्ह्यातील दारवा पोलीस (police) ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मानकोपर येथे याच एमडी पावडरची आयात निर्यात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर यवतमाळ येथील पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले असून त्यामध्ये तब्बल 11 लाख 32 हजार 800 रुपयांच्या पावडरसह 15000 किमतीचे इतर अमली पदार्थ जप्त केले आहेत.

या कारवाईमध्ये युनूस खान, अमीर खान पोसवाल (वय 36, रा. लोहार लाइन, पांढरकवडा), वसीम उर्फ राजा खान अक्रम खान (वय 34, रा. पठाण चौक, अमरावती), सय्यद इरशाद उर्फ पिंटू सय्यद गौस (वय 35, रा. इकबाल कॉलनी, अमरावती) यांना अटक करण्यात आली आहे. दारव्हा पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल महाराष्ट्रभर कौतुक होत आहे.

Updated : 18 May 2023 9:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top