MaxMaharashtra Impact: अखेर 10 वर्षांनी आरोग्य केंद्राला डॉक्टर मिळाला...
शशिकांत सूर्यवंशी | 23 May 2021 5:27 PM IST
X
X
10 वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच आले नाहीत...
या आशयाचं वृत्त मॅक्समहाराष्ट्र ने वृत्त प्रसारीत केलं आहे. या वृत्तात मॅक्समहाराष्ट्रने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेची स्थिती दाखवली होती.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील काही गावांमध्ये आज ही आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा प्रयत्नातून गावात आरोग्य उपकेंद्रांची इमारत उभी राहिली. मात्र, ती इमारत धूळ खात पडली असल्याचं वास्तव मॅक्समहाराष्ट्रने दाखवली होती.
हे रुग्णालय बंद असल्याने 32 गावांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. मॅक्समहाराष्ट्राने वृत्त दिल्यानंतर आज या दवाखान्याला डॉक्टर मिळाला आहे. गावातील दवाखान्याला डॉक्टर मिळाल्यानंतर आता गावकऱ्यांनी मॅक्समहाराष्ट्रचे आभार मानले आहेत.
Updated : 26 May 2021 1:59 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire