मॅक्स महाराष्ट्रचे पत्रकार धनंजय सोळंके महाकवी डॉ. वामनदादा कर्डक पुरस्काराने सन्मानित
X
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रमोद दुथडे फाउंडेशनच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्त घेतलेल्या कार्यक्रमात शाल श्रीफळ, गौरवचिन्ह व रोख धनादेशासह पुरस्कार देवून गौरव.
नांदेड येथील पत्रकार व मॅक्स महाराष्ट्रचे मराठवाडा ब्युरो धनंजय प्रल्हादराव सोळंके यांना छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्रमोद दुथडे फाऊंडेशनच्या वतीने 2024 चा राज्यस्तरीय महाकवी डॉ. वामनदादा कर्डक पुरस्कार देवून गौरवण्यात आले. गेल्या पंधरा वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत असलेल्या धनंजय सोळंके यांनी जिया न्युज,गर्जा महाराष्ट्र,महाराष्ट्र वन,ABP माझा आणि आता मॅक्स महाराष्ट्र अशा अग्रगण्य वृत्त वाहिन्यांवर पत्रकारिता केली आहे.
मराठवाड्यातील शेतकरी, कष्टकरी,विद्यार्थी, दुर्लक्षित समाजाचे प्रश्न राज्याच्या मुख्य पटलावर आणत सरकारला जाब विचारण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले आहे. या योगदानासाठी डॉ. प्रमोद दुथडे फाउंडेशनच्या वतीने त्यांना महाकवी वामनदादा कर्डक या पुरस्काराने गौरविण्यात आले. 18 ऑगस्ट रोजी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्य मंदिरात हा सोहळा पार पडला. या भव्य सन्मान सोहळ्यात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रमोद दूथडे कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी रोख रकमेसह,शाल, श्रीफळ, गौरवचिन्ह देवून त्यांना महाकवी डॉ.वामनदादा कर्डक पुरस्कार सन्मानाने प्रदान करण्यात आलाय.
या गौरव सोहळ्याला प्रमूख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक अनिल साबळे , व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड, शिक्षण महर्षी प्राचार्य सुनील वाकेकर रमेश पवार,डॉ, प्रमोद दुथडे, अभियांता अशोक येरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.सदर महाकवी डॉ.वामनदादा कर्डक राज्यस्तरीय समारोह रिपब्लिकन टायगर फोर्सचे अध्यक्ष विजयकुमार खंडागळे व डॉ. प्रमोद दुथडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडला.