Max Maharashtra Impact : जातीवाचक भाषेचा वापर, प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल
शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांविरोधात जातीवाचक भाषेचा वापर केल्याप्रकरणी अखेर प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विद्यार्थ्यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातून केली होती. त्यामुळे अखेर मॅक्स महाराष्ट्रच्या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने प्राचार्या उर्मिला परळीकर यांच्यावर एट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
X
कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड युवक अध्यक्ष अलोक कनोजिया व महिला अध्यक्ष प्रिंयका हाटे तसेच NSUI उपाध्यक्ष फैजल शेख यांनी ' मॅक्स महाराष्ट्र"कडे शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उर्मिला अतुल परळीकर यांच्याकडून विद्यार्थ्यांचा उल्लेख असंसदीय आणि अश्लील व जातीवाचक शब्दाने करत. त्यामुळे अशा प्रकारच्या भाषेचा वापर केल्याने जाणीवपुर्वक मानसिक छळ करत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. त्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाने दखल घेत प्राचार्या उर्मिला पळशीकर यांच्याविरोधात एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राचार्यांकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार करताना विद्यार्थ्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून प्रभारी प्राचार्य डॉ. उर्मिला अतुल परळीकर यांच्याकडून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सातत्याने अपमानित करून विद्यार्थ्यांसोबत असंसदीय, अश्लील व जातीसुचक भाषेचा वारंवार वापर करून जाणीवपूर्वक मानसिक छळ करण्याचे प्रकार सुरु आहेत. तसेच छोट्या कारणांवरून विद्यार्थ्यांच्या अंगावर ओरडून दमदाठी करून त्यांच्या मनात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यातच प्राचार्यांनी काही दिवसांपुर्वी विद्यार्थ्यांचा सर्व्हे घेतला होता. त्यामध्ये त्यांनी अश्लील प्रकारचे प्रश्न विचारले होते. त्यामध्ये मुलांना ते हस्तमैथून करतात का? किती वेळा करतात? कसे करतात? कधी करतात? यासह अश्लील प्रश्न विचारले होते. तसंच मुलांसमोर मुलींच्या प्रायव्हेट भागाबद्दल गलिच्छ टिपण्या करून मोजमाप करतात. त्यामुळे प्राचार्यांविरोधात लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
तसेच मागसवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना (SC/ST) वर्गात "आदिवासी" असे वारंवार उल्लेख करून सर्वांसमोर हीन वागणूक देत. त्यामुळे वारंवार सामाजिक भेदभाव निर्माण करून अपमानित केल्यामुळे अनुसूचित जनजाती प्रवर्गातील विद्यार्थी अशा सततच्या त्रासाला कंटाळून शिक्षण अर्धवट सोडण्याच्या विचारात आहेत. तसेच डॉ. उर्मिला परळीकर या जाणीवपूर्वक मागसवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना (SC/ST) लक्ष करून त्यांना शिक्षणा पासून वंचित कसे ठेवता येईल याच्या सतत प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे. याची कृपया नोंद घेऊन त्यांच्या विरुध्द विद्यार्थ्यांना जातीसुचक उल्लेख करत व त्यांना शिक्षणा पासून वंचित ठेविण्याचे कट करत असल्यामुळे Actrocity कायदा अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निवेदन विद्यार्थ्यांनी पोलिसांनी दिले होते. त्यामुळे कॉर्प्स संघटनेने प्राचार्य उर्मिला परळीकर यांना पदावरून काढून टाकत त्यांच्यावर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी उर्मिला परळीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.