Home > News Update > न भूतो न भविष्यती ;त्यागमूर्ती माता रमाई यांची १२५वी जयंती

न भूतो न भविष्यती ;त्यागमूर्ती माता रमाई यांची १२५वी जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr.B.R.Ambedkar) यांची १३२ वी जयंती त्याचबरोबर त्यागमुर्ती माता रमाई (Mata Ramai) यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५ वी) जयंती आणि डॉ बाबासाहेब आणि माता रमाई यांच्या लग्नाचा ११७ वा वाढदिवस असा एकत्र सोहळा वरळीच्या जांबोरी मैदानात मोठ्या जल्लोषात, अतिभव्य स्वरुपात शनिवार दिनांक ८ एप्रिल संध्याकाळी ५ वाजता साजरा करण्यात येणार आहे.

न भूतो न भविष्यती ;त्यागमूर्ती माता रमाई यांची १२५वी जयंती
X


भिमोत्सव समन्वय समिती वरळी-२०२३, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती आणि जय भीम शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर, त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंती उत्सवाबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या लग्नाचा वाढदिवस सोहळा एकत्रितपणे साजरा करण्याचा दुग्धशर्करा योग जुळला आहे. १३२ किलोचा केक, डोळयाचे पारणे फिटणारी आतषबाजी, अवकाशातून होणारी पुष्पवृष्टी या सोहळ्याचे आकर्षण असणार आहे.

यासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धिस्ट संगीतकार ’पावा’, बिगबॉस फेम आणि कोळी गाण्यांचे बादशहा सर्वांचा लाडका दादुस चौधरी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शास्त्रीय वादक पंडिक मुकेश जाधव त्याचप्रमाणे ऑस्कर फेम फिल्म कोर्टचे शिरीष पवार ,प्रविण डोणे , सोनाली सोनावणे , अनुजा कामत यांचे गायन व अत्युच्च दर्जाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा उपस्थितांना मनमुराद आनंद लुटता येणार आहे.

महिला, ज्येष्ठ नागरीक, लहान मुले व त्यांचे पालक यांना लाखोची बक्षिसे, पैठणी, सुटाचे कपडे, सोन्याची नथनी, चांदीचे नाणे, शालेय साहित्य, नऊवारी लुगडी, हजारो रूपयांचे गिफ्ट वाऊचर लकी ड्रॉ च्या माध्यमातून महाराष्ट्र बाजार पेठ, दादर यांच्याकडून देण्यात येणार आहे.



राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती तसेच एन. एस. चेस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने समता चषक २०२३ ही राष्ट्रीय दर्जाची अशी बुद्धिबळ स्पर्धा गरीब मुलांसाठी शुक्रवार दि. ७ एप्रिल रोजी जांबोरी मैदानातील ललित कला भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमासंदर्भात प्रमोद यांच्याशी

98209 62033 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहान कार्यक्रमाचे समन्वयक डॅा विजय कदम यांच्याकडून करण्यात आले.


Updated : 6 April 2023 5:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top