Home > News Update > समाजकल्याण मंत्र्यांचा मतदारसंघात गांजाची सामूहिक शेती, तिघांना अटक

समाजकल्याण मंत्र्यांचा मतदारसंघात गांजाची सामूहिक शेती, तिघांना अटक

समाजकल्याण मंत्र्यांचा मतदारसंघात गांजाची सामूहिक शेती, तिघांना अटक
X

ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानची अटक आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी झालेली अटक यामुळे सध्या राज्यात चरस-गांजा याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण बीड जिल्ह्यात चक्क गांजाची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

एकीकडे ड्रग्ज प्रकरणी झालेली कारवाई वादात असताना बीड जिल्ह्यात गांजा सर्रासपणे शेतात पिकवला जात असल्याचे समोर आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी परळी तालुक्यातील मोहा गावात अफूची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता, शेकडो एकर जमिनीवर अफूची शेती होत असल्याचे समोर आल्यानंतर शंभर पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते, आता याच तालुक्यात गांजाची शेती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात असलेल्या हाळंब गावात गांजाची सामूहिक शेती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ग्रामीण पोलिसांनी या शेतीवर छापा घातला असता सामूहिक गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून दोन क्विंटल गांजा जप्त करण्यात आला आहे.

Updated : 29 Oct 2021 7:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top