Home > News Update > 'मराठी माणसाला चॅलेंज करायचे नाही'; राज ठाकरेंचा शिलेदार अयोध्येत पोहोचलाच

'मराठी माणसाला चॅलेंज करायचे नाही'; राज ठाकरेंचा शिलेदार अयोध्येत पोहोचलाच

मराठी माणसाला चॅलेंज करायचे नाही; राज ठाकरेंचा शिलेदार अयोध्येत पोहोचलाच
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thakare) यांच्या अयोध्या (ayodya) दौर्यावरुन वाद झाल्यानंतर उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आम्ही अयोध्येत पाऊल ठेऊन देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी दिला होता. षडयंत्र आणि प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंनी दौरा पुढे ढकलला असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज म्हणजे ५ जूनला अयोध्येत जाण्याची घोषणा केली होती. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह

यांनी आव्हान दिले होते. उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आम्ही अयोध्येत पाऊल ठेऊन देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी दिला होता. त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अयोध्या दौरा पुढे ढकलावा लागला होता. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ठाण्यातील धडाडीचे नेते अविनाश जाधव हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत आल्यावर रविवारी त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले. अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून ही माहिती दिली. (MNS leader Avinash Jadhav in Ayodhya)

आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आम्ही ठरवल्यावर कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट पूर्ण करतोच. काहीवेळापूर्वीच आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले. तसेच बृजभूषण सिंह यांचा कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणीही आम्ही गेलो होतो, असे अविनाश जाधव यांनी म्हटले. राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्येत येणार तेव्हा त्यांना रोखण्यासाठी बृजभूषण सिंह कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येत येणार होते. मनसेचे नेते आणि कार्यकर्ते अयोध्येत आल्यास आम्ही त्यांना शरयू नदीत बुडवू, अशी गर्जनाही बृजभूषण सिंह यांनी केली होती. मात्र, हे आव्हान स्वीकारत आता अविनाश जाधव हे थेट अयोध्येत जाऊन पोहोचले. कोणीही मराठी माणसाला चँलेज करायचे नाही. आम्ही आलोय, आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. आम्हाला धमक्या द्यायचे बंद करा. ज्यादिवशी राज ठाकरे आदेश देतील तेव्हा या सगळ्यांना यांची जागा आम्ही दाखवून देऊ, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे.

Updated : 5 Jun 2022 2:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top