मराठी माणूस बनला गुजरात भाजप अध्यक्ष
X
गुजरात राज्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष पदी पहिल्यांदाच मराठी माणसाला बहुमान मिळाला आहे.भाजपचे नवसारीचे खासदार सी आर पाटील ह्यांना गुजरात ची मोठी जबाबदारी भाजप ने दिली आहे.
सी आर पाटील हे मूळचे खान्देशातील जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री या छोट्याश्या गावात त्यांचा जन्म झाला. पाटील हे रोजगारासाठी गुजरात राज्यातील सुरत येथे आले, सुरूवातीला पोलीस दलात भरती झाले.
त्यानंतर राजकारणात प्रवेश केला नावसारीचे महापौर पदी निवड झाल्यावर नावसारी शहराचा कायापालट केला.
नरेंद्र मोदी गुजरात चे मुख्यमंत्री असताना सी आर आर पाटील हे जी आर डी सी चे चेअरमन होते. त्या काळात केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून नावसारी मतदार संघासाठी भाजपचे खासदारकीच तिकीट मिळाले आणि सलग तीन वेळा निवडून आले. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा 6 लाख 89 हजार विक्रमी मतांनी निवडून आले.
पाटील यांनी नावसारी मतदार संघात तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करून प्रत्येक मतदाराची माहिती, त्या त्या भागातील विकास काम, समस्या आणि त्याचं निराकारण करण्यासाठी विशेष यंत्रणा आहे.
हे ही वाचा
इस्तंबुल आणि इस्लामाबादमधील धर्माचं राजकारण लोकशाहीसाठी धोक्याचं – जतीन देसाई
ऑक्सफर्ड विद्यापीठाची कोरोनावरील लस मानवी चाचणीत यशस्वी
नावसारी मतदार संघाच्या त्यांच्या कार्यालयास आयएसओ प्रमाण मिळवणारे देशातील एकमेव खासदार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून सी आर पाटील यांचे नाव सर्वात पुढे आहे. मोदींच्या वाराणशी मतदार संघाच्या विकास कामांची जबाबदारी पाटील यांच्याकडेच सोपवली आहे. मागे झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतही पाटील यांना विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याची चर्चा ही चांगलीच रंगली होती.
एका लहानश्या गावातील मराठी माणसाला प्रथमच गुजरात प्रदेश अध्यक्षपद मिळाल्याने त्याचं कौतुक केलं जात आहे. सी आर पाटील यांचे आज ही खान्देशाशी नाळ कायम आहे. त्याचं जळगाव जिल्ह्यात आजही येणं-जाणं कायम आहे. जळगावात त्याचं घर ही आहे.