मराठी सिनेअभिनेते आशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण जाहीर
X
मराठी चित्रपट सृष्टीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयानाचा महाराष्ट्रातल्या जनसामान्याच्या मनावर आगळा वेगळा ठसा उमटवणारे मराठी अभिनेते आशोक सराफ यांना नुकताच 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशोक सराफ यांचं फोनवरून अभिनंदन केलं.
विविध कला गुणांचं आणि वेगवेगळ्या छटांचं दर्शन आशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून केलंलं आहे, त्यामूळे त्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्याचं घोषीत करण्यात आलेलं आहे.
यावेळी आशोक सराफ आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले की, "या अभिनय क्षेत्रात मी माझ्या आयुष्याची ५० वर्षे घालवली याची कुठेतरी नोंद घेतली याचा मला फार आनंद वाटला, त्याबद्दल राज्यसरकारचे तसेच तमाम रसिक श्रोत्यांचे खूप खूप आभार"
आशोक सराफ पुढे असेही म्हणाले की, आत्तापर्यंत पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर यांसारख्या अनेक दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, त्यांच्या रांगेत मला बसवलं, माझ्यावर भरभरुन प्रेम केलं त्याबद्दल महाराष्ट्रातील सगळ्या रसिक - प्रेक्षकांचं जाहीर आभार.