Home > News Update > Maratha Reservation: संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला...

Maratha Reservation: संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला...

मागण्या मान्य न झाल्यास संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा...

Maratha Reservation: संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला...
X

courtesy social media

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांच्यासह राज्यातील मराठा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षण मिळेपर्यंत खासदार संभाजीराजे यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे खासदार संभाजी राजे यांनी कोल्हापूरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाजवळ 16 जूनला मूक आंदोलन केले होते.

त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांनी भेटीसाठी बोलावलं आहे. यावर आज संभाजीराजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

मूक आंदोलन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलावलं आहे. मी स्वागत करतो. चर्चा सकारात्मक होईल. अशी अपेक्षा आहे. मात्र, झाली नाही काय होईल ते मला सांगायची गरज नाही. आज ची भेट उद्या व्हावी अशी समन्वयकाची भूमिका होती. पण मुख्यमंत्र्यांचा आज बैठक घेण्यासाठी आग्रह होता. भेटी आदी समन्वयकांची कोणतीही बैठक होणार नाही. आरक्षणासाठी लढा कायम राहणारच आहे. तो लढा चालू असताना राज्य सरकारने आपल्या हातातल्या गोष्टी मार्गी लावाव्यात. केंद्र स्तरावर माझे प्रयत्न या अगोदर पासून सुरू आहे..अनेकांनी पत्र ही दिलं आहेत. समाजाचं हित होणार असेल तर घटनेत दुरूस्ती होऊ शकते.अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्राचा दौरा करुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (Cm Uddhav Thackrey On Maratha Reservation), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यानं संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात कोल्हापूर येथे 'मूक आंदोलन' केलं जाणार आहे.

या आंदोलनात वंचित बहुजून आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते.

काय आहेत खासदार संभाजी राजे यांनी केलेल्या मागण्या? (MP Sambhaji Raje Chhatrapati on Maratha reservation)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (SC On Maratha reservation) रद्द केल्यानंतर खासदार संभाजीराजे केंद्र आणि राज्यसरकारवर अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत काही मागण्या केल्या आहेत. त्यातील

1) रिव्ह्यू पिटीशन लोकांना दाखवण्यासाठी फाईल करू नका तर ती फुलप्रुफ दाखल करा...

2) क्युरिटीव्ह पिटीशन

3) घटना कलम 342-A नुसार राज्यपाल यांच्याकडे प्रस्ताव सादर करून तो पुढे राष्ट्रपती आणि त्यानंतर संसदेकडे सादर केला जाईल आणि त्यातून आरक्षण मिळणं सोप्प होईल. या तीन मागण्या केल्या आहेत.

खासदार संभाजीराजे यांनी राज्याचा दौरा करून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधत या सूचनांची अंमलबजावणी सरकारने केली नाही. तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला होता.

Updated : 17 Jun 2021 1:57 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top