मराठा आरक्षण संदर्भातील सुनावणी संपली ; कोर्टाने निकाल आरक्षित ठेवला
X
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहीलेल्या आणि गेल्या दहा दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली मराठा आरक्षणा संदर्भातील सुनावणी आता पूर्ण झाली असून, न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुनावणी दरम्यान केंद्र सरकार, राज्य सरकार,आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे आणि आरक्षणाच्या बाजूने याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्ते अशा सर्व बाजूंनी युक्तिवाद आता पूर्ण झालेला आहे.तसेच काही राज्यांची भूमिका सुद्धा न्यायालयाने यावेळी जाणून घेतली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या ५ न्यायाधीशांच्या पीठात न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती रविंद्र भट यांचा समावेश आहे.
त्यामुळे महाराष्ट्रासाठी आणि मराठा समाजासाठी अति महत्वाचा असलेल्या मराठा आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.तर होळी नंतर हा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.