Home > News Update > मराठा आरक्षण विधेयक मंजूर; सगेसोयऱ्यांवरून वाद सूरूच

मराठा आरक्षण विधेयक मंजूर; सगेसोयऱ्यांवरून वाद सूरूच

मराठा आरक्षण विधेयक मंजूर; सगेसोयऱ्यांवरून वाद सूरूच
X

राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणविषयक विधेयक सादर करण्यात आले असून ते बिनविरोध एकमताने मंजूर करण्यात आले आहे. या अधिवेशनात राज्यपालांनी अभिभाषण केल्यानंतर अधिवेशनात प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधेयक सादर केलं आहे.

यामध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि नौकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रस्तावावर आवाजी मतदानाने मतदान घेऊन हा प्रस्ताव बहुमताने पारीत करून मंजूर करत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली, मात्र हा प्रस्ताव बहुमताने नव्हे तर एकमताने मंजूर करण्यात यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विधेयकावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया -

राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात विधेयक सादर करण्यात आले असून ते एकमताने मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकावर जरांगे म्हणाले की, विधानसभेत मराठा आरक्षण एकमताने मंजूर झाले याचे स्वागतच आहे, पण ही आमची मागणी नव्हती. आम्ही ओबीसीतूनच आमचे हक्काचे कुणबी आरक्षण मिळविणार.

छगन भूजबळ विधानसभेत जरांगेविरोधात आक्रमक -

आज मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. आमचा त्याला विरोध नाही. पण आज ज्या जरांगेचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला, ते सातत्याने धमक्या देत आहेत. मला स्वतःलाही धमक्या देत आहेत. एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनाही आई-बहिनीवरून शिव्या घालत आहेत. तिथे मध्यस्थी करण्यासाठी गेलेले महसूल आयुक्त, एसपी, कलेक्टर यांनाही ते तुम्ही भाडखाऊ आहात अशी शिवीगाळ करत आहेत. या दादागिरीला कुणी लगाम घालणार आहे की नाही ? असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.

Updated : 20 Feb 2024 4:23 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top