मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित; मनोज जरांगेंची घोषणा
राज्यात सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सूरू आहेत त्यामूळे हे आंदोलन येत्या ३ मार्चपर्यंत स्थगित केले जात असून तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाईल त्याचबरोबर पुढील ८ दिवस मराठा समाजाने संयमी राहून सरकार काय करते ते पहावे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
X
बुधवारी मराठा आरक्षणाचे आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित करण्याची घोषणा मराटा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. राज्यात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सध्या परिक्षा सूरू असल्याकारणाने हे आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत आहे, तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाईल, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मराठा समाजाविषयी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात द्वेष भरल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. फडणवीसांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष भरला आहे, त्यांनी मला तुरूंगात डांबले तर त्यांना मराठा समाज काय आहे हे कळेल. विशेषतः कापूस फुटल्यानंतर जसे संपूर्ण शेत पांढरे दिसते, तसे सर्वत्र मराठेच दिसतील, असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमधील एका रूग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सूरू आहेत. तिथे त्यांनी पत्रकारांशी बुधवारी सकाळी संवाद साधला. त्यात त्यांनी मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. राज्यात सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा सूरू आहेत त्यामूळे हे आंदोलन येत्या ३ मार्चपर्यंत स्थगित केले जात असून तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाईल त्याचबरोबर पुढील ८ दिवस मराठा समाजाने संयमी राहून सरकार काय करते ते पहावे. आपसात कोणतीही चलबिचल होऊ देऊ नका. आपली ओबीसीतून आपक्षण देण्याची मागणी आहे. त्यात कोणताही बदल झाला नाही, असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.