मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार
X
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकऱणातील गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे. मनसुख हिरेन यांचा काल मुंब्रा रेतीबंदर खाडीत मृतदेह आढळल्यानंतर अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाला वेगळं वळण लागल आहे. त्यामुळे हिरेन यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मनसुख हिरेन यांच्या घरी नातेवाईक येण्यास सुरुवात झाली आह. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट जाहीर करा आणि मगच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका मनसुख यांच्या नातेवाईकांनी गेतली आहे. पोस्टमार्टम अहवाल, मृत्यूचे कारण आधी जाहीर करा व पोस्टमार्टम करतांना केलेलं चित्रीकरण आम्हाला दाखवा तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका हिरेन यांच्या कुटुंबियानी घेतली आहे.