ती कॉलरट्यून बंद करा.. मनसे नेते बाळा नांदगावकरांचे आवाहन
X
सध्या कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहेत. अनेक सार्वजानिक ठिकाणचे निर्बंध हि हटवले गेले.त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी कोरोना लसीकरण ची कॉलर ट्यून बंद करा. असे सरकारला आवाहन केले आहे.याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
कोरोना लसीकरण ची कॉलर ट्यून तात्काळ बंद करा. अनेक महत्वाचे फोन लवकर लागत नाही, फोन लागला की नाही तेही कधी कधी कळत नाही. जी काही जनजागृती करायची होती ती झाली आहे म्हणूनच 180 कोटी डोस दिले गेले आहेत.अशा प्रकारचे ट्विट केले आहे.अनेक निकडीच्या प्रसंगात त्या कॉलरट्यूनचा अडथळा येतो. यासाठी ती कॉलर ट्यून बंद करण्यात यावी. असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.
कोरोना लसीकरण ची कॉलर ट्यून तात्काळ बंद करा. अनेक महत्वाचे फोन लवकर लागत नाही, फोन लागला की नाही तेही कधी कधी कळत नाही. जी काही जनजागृती करायची होती ती झाली आहे म्हणूनच 180 कोटी डोस दिले गेले आहेत.@zee24taasnews@TV9Marathi@News18lokmat @abpmajhatv @saamTVnews
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) March 26, 2022
शाळा कॉलेज ही ऑफलाईन पद्दधतीने सुरु झाले आहेत. चित्रपटगृह नाट्यगृह हि १०० टक्के क्षमतेने सुरु झाले आहेत.