Home > News Update > मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली.. नाकातून रक्त येत असल्याने चिंता वाढली

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली.. नाकातून रक्त येत असल्याने चिंता वाढली

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली.. नाकातून रक्त येत असल्याने चिंता वाढली
X

जालना/अजय गाढे : एकीकडे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना, दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र, मागील पाच दिवसांत त्यांनी अन्न, पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे. आज सकाळपासून जरांगे यांचे हात थरथरतायात, बोलण्यास देखील त्रास होत आहे.तर त्यांच्या नाकातून देखील रक्त येत आहे त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहका-यांची चिंता वाढली आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून, गावकरी,महिला, लहान मुले,मित्र सहकारी त्यांना वारंवार पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह करत आहेत. सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी देखील जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली.तसेच काल छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त मधुकर आर्दड यांनी देखील त्यांना भेट देत पाणी पिण्यासाठी विनंती केली होती

मात्र, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नसून, पाणी व उपचार घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. तर, काल रात्रीपासून जरांगे यांची प्रकृती खालवल्याने जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये भावनिक असं वातावरण निर्माण झाला आहे.

Updated : 14 Feb 2024 12:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top