मनोज जरांगे पाटील आता दिल्लीत धडकणार, सरकारला इशारा
X
Maratha Reservation Live Update : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यसरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनात मराठा समाजाला नौकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण सरकारच्या या निर्णयानंतर सरकारने आमची फसवणूक केली असल्याची जरांगे पाटलांनी म्हटले आहे. त्यामूळे ही चूक आता राज्य सरकारला महागात पडणार असल्याचं दिसतंय. तर मनोज जरांगेंनी यांनी आता महाराष्ट्र नव्हे तर दिल्लीत धडकण्यात येणार असल्याचा सरकारला इशारा दिला आहे.
मराठे कधीच कुठल्या युध्दात उतरत नाहीत अन् जर उतरले तर विजयी होऊनच टिळा लाऊन माघारी फिरतात असं म्हणत या आंदोलनाची दिशा आजच ठरवणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसंच हे दंड कुठं आणि कधी थोपटणार याबाबतीत जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. एकीकडे दिल्लीत शेकऱ्यांचे आंदोलन चालू आहे आणि अशातच जरांगे पाटलांनी दिल्लीत धडकणार असल्याचा सरकरला इशारा दिला आहे. त्यामूळे राज्यसरकारची डोकेदूखी आणखीच वाढणार असल्याचं दिसतंय.