गोरगरिबांचा आक्रोश लक्षात घ्या ; मनोज जरांगेंचं अजित पवारांना आवाहन
X
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठकांवर बैठका सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यावर सरकारला तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी आमच्याविरोधात जे बोलतात त्यांना आम्ही सोडत नाही, असं म्हणत विरोधकांना सूचक इशाराही दिला.
दरम्यान यावेळी मनोज जरांगे म्हणाले, “आमच्याविरोधात जे बोलतात त्यांना आम्ही सोडत नाही. आपला दणका असा आहे. त्यामुळे जो बोलत नाही त्याला विनाकारण का लक्ष्य करायचं, मग तो कुणीही का असेना. मात्र, जे सत्तेत आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय लावून धरावा हा त्यांना आमचा संदेश आहे.” आम्ही अजित पवारांना विनंती करतो की अजित पवारांनी कमी पडलो असं म्हटलं. आता आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी चार-पाच पक्षांना एकत्र घेऊन हा विषय लावून धरावा. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावं. गोरगरिबाचं कल्याण करावं. दुसरी आमची काहीही मागणी नाही. आमच्या गोरगरिबांचा आक्रोश त्यांच्या लक्षात येत असेल,” असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.