Home > News Update > Manoj Jarange March to Mumbai : सरकारला भिती; जरांगेसोबत लोकं किती? मुख्यमंञ्यांकडून तातडीची बैठक

Manoj Jarange March to Mumbai : सरकारला भिती; जरांगेसोबत लोकं किती? मुख्यमंञ्यांकडून तातडीची बैठक

मराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्यांच्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी अंतरवली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा काढला जाणार आहे. जरांगे साठी ठिकठिकाणी केली आहे भोजन आणि मुक्कामाची व्यवस्था.

Manoj Jarange March to Mumbai : सरकारला भिती; जरांगेसोबत लोकं किती? मुख्यमंञ्यांकडून तातडीची बैठक
X


मराठा आंदोलक मनोज जरांगे हे त्यांच्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी अंतरवली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा काढला जाणार आहे. तसेच मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे २६ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत. आज सकाळपासून अंतरवाली सराटी गावात मराठा समाज बांधव जमा होण्यास सुरू झाले आहेत. यादरम्यान राज्य सरकार देखील अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठा आंदोलक आज मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. आज दुपारी 3 वाजता मंख्यमंत्र्याचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावर अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मनोज जरांगे आणि मराठा बांधव मुंबईत धडकण्याआधीच सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढणार का? हे पाहावे लागणार आहे.

मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे आंदोलन जरांगे पाटील आज (Manoj Jarange) (20 जानेवारी) रोजी मुंबईला रवाना होणार आहेत. त्यांनी मुंबईच्या दिशेने मिळेल ते वाहन घेऊन शांततेने चला असे अवाहन मराठा बांधवांना केले आहे. मुंबईला निघण्यापूर्वी आंदोलनाचा संपूर्ण वेळापञक (Timetable) जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कोणत्या तारखेला नेमके काय करायचे याची विस्तृत माहीती आज मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती

असं असेल मनोज जरांगे यांच्या यात्रेचं संपूर्ण प्रवास नियोजन ( Manoj Jarange March Planning to Mumbai Complete Schedule)

२० जानेवारी - पहिला दिवस : अंतरवाली ते मातोरी.

यात्रेला सुरुवात अंतरवालीतून पायी आणि वाहनाने होईल. अंतरवालीतून सकाळी ९ वाजता शुभारंभ होऊन, कोळगाव ता. गवराई येथे दुपारचे जेवण होईल, मातोरी ता. शिरूर येथे मुक्काम व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

२१ जानेवारी - दुसरा दिवस : मातोरी ते करंजी बाराबाभळी.

मातोरीमधून सकाळी ८ वाजता पुढे निघणार, तनपुरवाईला आणि पाथर्डी येथे दुपारचे जेवण, बाराबाभळी-कारंजी बाट ता. नगर येथे मुक्काम / जेवण होईल.

२२ जानेवारी - तिसरा दिवस : बाराबाभळी ते रांजणगाव.

बाराबाभळीमधून सकाळी ८ वाजता निघतील, सुपा ता. पारनेरे याठिकाणी दुपारी जेवण, रांजणगाव ता. शिरूर येथे मुक्काम/जेवणाची व्यवस्था.

२३ जानेवारी - चौथा दिवस : रांजणगाव ते चंदन नगर, खराडी बायपास.

रांजणगावातून सकाळी ८ वाजता, कोरेगाव भिमा येथे दुपारी जेवण, चंदनगर-खराडी बायपास मुक्काम/जेवणाची व्यवस्था होईल.

२४ जानेवारी - दिवस पाचवा : खराडी बायपास ते लोणावळा.

चंदन नगर, खराडी बायपास मार्गे सकाळी ८ वाजता रवाना होणार, तळेगाव दाभाडे येथे दुपारचे जेवण, लोणावळा येथे मुक्काम/जेवणाची व्यवस्था.

२५ जानेवारी - दिवस सहावा : लोणावळा ते वाशी

लोणावळ्यातून सकाळी ८ वाजता पनवेलच्या दिशेने रवाना, ता, नवी मुंबई येथे दुपारी जेवण, वाशी येथे मुक्काम/जेवणाची व्यवस्था.

२६ जानेवारी - दिवस सातवा: वाशी ते आझाद मैदान-मुंबई

वाशीतून सकाळी ८ वाजता नाष्टा करून निघणार, आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार.

२६ जानेवारी - आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला सुरुवात होणार.

तर असा आहे जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंतचा प्रवास.




Updated : 20 Jan 2024 4:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top