Home > News Update > मनोज जरांगे यांचा मुंबईला जाण्याचा निर्धार पक्का; अशी केली आहे प्रवासाची तयारी

मनोज जरांगे यांचा मुंबईला जाण्याचा निर्धार पक्का; अशी केली आहे प्रवासाची तयारी

मनोज जरांगे यांचा मुंबईला जाण्याचा निर्धार पक्का; अशी केली आहे प्रवासाची तयारी
X

मुंबईला जाण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची तयारी पूर्ण झालीय सरकारच्या शिष्टमंडळांनी दोन वेळा मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला परंतु मनोज जरांगे पाटील हे मुबंईला जाण्यावर ठाम आहेत उद्या 21 जानेवारीला सकाळी 9 वाजता मनोज जरांगे हे सराटी अंतरवाली वरून पद यात्रेस सुरुवात करतील दुपारी कोळेगाव ता. गेवराई या ठिकाणी भोजन होईल त्यानंतर रात्री मुक्काम, हा शिरूर तालुक्यातील मातोरी या ठिकाणी असेल दिवस दुसरा म्हणजेच 21 जानेवारीला मातोरी या गावातून ते समोर तनपुरीवाडी ता पाथर्डी या ठिकाणी भोजन करतील आणि पुढे बाराभाभली (करंजी घाट) या ठिकाणी मुक्कामी थांबतील.

दिवस तिसरा जानेवारी 22 करंजी घाटापासून ते निघतील व दुपारी सुपा या ठिकाणी भोजनासाठी थांबतील रात्री रांजणगाव या ठिकाणी ते मुक्कामी असतील दिवस तिसरा 23 जानेवारीला ते दुपारपर्यंत भीमा कोरेगाव या ठिकाणी दुपारचे भोजन करतील त्यानंतर पुणे येथील चंदन नगर पुणे येथे मुक्कामी राहतील दिवस चौथा 24 जानेवारी पुणे शहरातील जगताप डेरी डांगे चौक- चिंचवड ते देहू फाटा या ठिकाणी भोजन करतील व पुढे रात्री मुक्कामी लोणावळा या ठिकाणी मुक्कामी असतील या नंतर दिवस पाचवा 25 जानेवारी पनवेल या ठिकाणी दुपारी ते भोजन करतील यानंतर पुढे वाशी या ठिकाणी ते रात्री मुक्कामी थांबतील पुढे दिवस सहावा 26 जानेवारी रोजी मुंबई येथील चेंबूर वरून पदयात्रा काढत आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या ठिकाणी मनोज जरांगे हे आंदोलनासाठी दाखल होणार आहेत अश्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांची संपूर्ण ही प्रवासाचा दिनक्रम करण्यात आला आहे या आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहे.

Updated : 19 Jan 2024 6:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top