Home > News Update > मणिपुरमध्ये नागरिक रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांकडून NRC चा मुद्दा केंद्राच्या कोर्टात

मणिपुरमध्ये नागरिक रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांकडून NRC चा मुद्दा केंद्राच्या कोर्टात

मणिपूरमध्ये एनआरसी लागू करण्याबाबत अनेक संघटना रस्त्यावर आल्या आहेत. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी एनआरसीचा चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला आहे.

मणिपुरमध्ये नागरिक रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांकडून NRC चा मुद्दा केंद्राच्या कोर्टात
X

दोन वर्षापुर्वी NRC लागू करू नये, अशी मागणी करत देशभरात मोर्चे, निदर्शने केली जात होती. या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याला ईशान्य भारतातील राज्यांनी विरोध केला होता. मात्र आता मणिपुरमधूनच NRC लागू करण्याची मागणी काही संघटनांनी केली आहे. त्यामुळे NRC चा मुद्दा पुन्हा डोकेदुखी ठरणार आहे.

मणिपूरमध्ये 'NRC' लागू करावा या मागणीसाठी विविध संघटना, महिला या रस्त्यावर उतरल्या आहेत. तर ठिकठिकाणी रॅली काढून जाहीर निषेध नोंदविण्यात येत आहे. यामुळे भारतातील 'NRC'चा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला असून ते संपूर्ण देशासाठी डोखेदुखी ठरणार आहे. (Manipur agitation for NRC)

मणिपुरमध्ये 'NRC'लागू करावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून विविध संघटना, महिलांची मोर्चे, आंदोलने सुरु आहे. याठिकाणी दिवसेंदिवस परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसून येत आहे. दरम्यान या विषयावरून देशभरात गदारोळ सुरु झाला आहे. तर दुसरीकडे 'NRC' लागू करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. त्यांनी ती तत्काळ द्यावी. आमचे राज्य 'NRC' लागू करण्यासाठी सकारात्मक आहे, असे विधान मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी केले आहे. तत्पूर्वी 'NRC' ला सुरुवातीपासून विरोध केला जात होते. यासाठी अनेक आंदोलने दिल्लीत झाली आहे. मात्र 'NRC' लागु करण्यासाठी मणिपुर राज्याने सकारात्मक भूमिका दाखवल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार याला परवानगी देते का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकारने 'NRC'ला परवानगी दिल्यास पुन्हा आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Updated : 1 April 2023 9:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top