Home > News Update > "लव्ह जिहाद विरोधात नवीन कायदा लागू करणार" – महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच वक्तव्य

"लव्ह जिहाद विरोधात नवीन कायदा लागू करणार" – महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच वक्तव्य

लव्ह जिहाद विरोधात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश कायदा लागू करण्यात आला आहे. परंतू महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा नसल्यामुळे अनेक गैरकृत्य घटना घटत आहेत.

लव्ह जिहाद विरोधात नवीन कायदा लागू करणार – महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच वक्तव्य
X

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लव्ह जिहादमुळे गैरकृत्य होत असल्यामुळे लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाईल अशी घोषणा महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.नुकतीच दिल्लीतील लव्ह जिहादमुळे श्रध्दा वालकर तरुणीची हत्या करण्यात आली होती. ही तरुणी महाराष्ट्रात राहणारी असल्यामुळे पुन्हा असे कृत्य इतर मुलींच्या बाबतीत घडू नये म्हणून कडक कायदा तयार करण्यात येईल असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला. लव्ह जिहादमुळे अनेक मुली महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी महिला कायदा अंतर्गत विशेष समिती स्थापन केली जाईल. त्यामुळे या समितीमुळे किती महाराष्ट्रातील मुलींचा शोध लागेल ते पाहण महत्त्वाच ठरेल. यापूर्वी लव्ह जिहाद थांबवण्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मध्ये येथे कायदा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा होणे गरजेचे आहे. हिवाळी अधिवेशनात नागपूर येथील लव्ह जिहाद विरोधात कायदाला मान्यता मिळावी यासाठी मागणी करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार प्रविण मोटो यांनी दिली.

महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा नसल्यामुळे कोल्हापूरातील शाळकरी मुलगी बेपत्ता झाली होती, हे प्रकरण लव्ह जिहादच असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील आंदोलन केले होते. २७ सप्टेंवरला देखील मुंबईतील हिंदू मुलीने बुरखा घालायला नकार दिल्यामुळे तीचा गळा चिरडण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व घटक स्तरातून लव्ह जिहाद विरोधात कायदा महाराष्ट्रात लवकरात लवकर आमलात आणावा अशी मागणी केली जात आहे.

Updated : 19 Nov 2022 7:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top