#LockDownYatra: मंदीराच्या श्रीमंत संस्थानांनी दुकानदारांना काय मदत केली?
X
मंदीराच्या संस्थानिकांना देव महत्त्वाचा की देवाला मिळणारा दानरुपी पैसा? आपल्या देशातील मंदीराचा पैसा कुठं जातो..? लॉकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या मंदीराबाहेरील दुकानदारांना मंदीराचे संस्थानिक मदत का करत नाही? पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट...
गेल्या 8 महिन्यांपासून बंद असणारी धार्मीक स्थळ पाडव्या ला राज्यसरकार ने खुली केली आहेत. धार्मिक स्थळांमुळे अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो.
मंदीर, मस्जिद, गुरुद्वारा सारख्या धार्मिक स्थळाबाहेर अनेकांची दुकान चालतात. आपल्या देशात हिंदूंची संख्या जास्त असल्याने मंदीरांची संख्या देखील जास्त आहे. मात्र, 8 महिन्यांपासून ही मंदीर बंद असल्यानं मंदीरावर अवलंबून असणाऱ्या अनेक लोकांचा रोजगार गेला होता.
आज ही मंदीर उघडली आहेत. त्यामुळं या लोकांना पुन्हा एकदा रोजगार सुरु झाला आहे. मात्र, परिस्थिती पुर्वपदावर आली आहे का? कोरोनाच्या भितीने आज पहिल्याच दिवशी लोक मंदीरात आले का? काय आहे मंदीर आणि मंदीराबाहेरचं आर्थिक गणित...
पाहा मंदीरावर पोट अवलंबून असलेल्या छोट्या दुकानदाराच्या व्यथा...
#लोकडोवनयात्रा