काश्मीर: दहशतवाद्यांचा रक्तरंजित खेळ सुरु, मागील 24 तासात 2 लोकांची हत्या
काश्मीर: दहशतवाद्यांचा रक्तरंजित खेळ सुरु, मागील 24 तासात 2 लोकांची हत्या
X
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा रक्तरंजित खेळ सुरू केला आहे. दहशतवाद्यांनी २४ तासांत दोन जणांची हत्या केली आहे. त्यापैकी एक काश्मिरी पंडिताच्या दुकानात काम करायचा. स्थानिक लोकांबरोबरच बाहेरचे लोकही होते. गेल्या महिन्यातही दहशतवाद्यांनी काही लोकांची हत्या केली होती. यामध्ये हिंदू, शीख आणि मुस्लिमांचा समावेश होता.
दहशत पसरवण्यासाठी दहशतवाद्यांनी गेल्या महिन्यात 11 निरपराध लोकांची हत्या केली होती. त्यांच्यामध्ये श्रीनगरमध्ये मेडिकल स्टोअर चालवणारे माखन लाल बिंद्रू होते. बिंद्रूला त्याच्या दुकानात गोळ्या घातल्या होत्या. 1990 मध्ये जेव्हा दहशतवाद शिगेला पोहोचला होता. जेव्हा हजारो काश्मिरी पंडितांना आपलं ठिकाण सोडावं लागलं होतं. तेव्हा बिंद्रू तिथेच राहिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे हल्ले 'द रेझिस्टन्स फ्रंट' नावाच्या संघटनेने आणि कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाने केले आहेत.
दरम्यान सोमवारी श्रीनगरमध्ये काश्मिरी पंडितांच्या दुकानावर गोळीबार झाला होता. यामध्ये मोहम्मद इब्राहिम नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. इब्राहिम हा दुकानात सेल्समन होता. तो बांदीपोरा जिल्ह्यातील रहिवासी होता. 29 वर्षांनंतर 2019 मध्ये हे दुकान पुन्हा सुरू करण्यात आले. यापूर्वी रविवारीही बटमालू येथे दहशतवाद्यांनी एका पोलिसाची हत्या केली होती.
राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दहशतवादी कृत्याचा निषेध केला आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसर रिकामा करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
कश्मीर मध्ये होत असलेल्या या हल्ल्यानंतर खोऱ्यातील अनेक भागांतून पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांचे स्थलांतर झाल्याच्या बातम्या येत आहेत. यापूर्वी 1990 मध्ये खोऱ्यातून काश्मिरी पंडितांचे पलायन झाले होते.
दरम्यान कश्मीर पंडितांवर वाढत्या हल्ल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. 11 लोकांच्या मृत्यूनंतर केलेल्या कारवाईत 17 दहशतवादी मारले गेले. काश्मीरमध्ये अतिरिक्त 5000 सैनिक तैनात करण्यात आले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनीही काश्मीरला भेट देऊन सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
900 हून अधिक लोक ताब्यात
ही कारवाई करताना सुरक्षा दलांनी 900 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी अनेक जण जमात-ए-इस्लामी या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधीत असल्याचे सांगितले जात आहे.