Home > News Update > थरारक : सुरक्षा भिंतीवरुन समुद्रात पडलेल्या महिलेला वाचवण्यात यश

थरारक : सुरक्षा भिंतीवरुन समुद्रात पडलेल्या महिलेला वाचवण्यात यश

थरारक : सुरक्षा भिंतीवरुन समुद्रात पडलेल्या महिलेला वाचवण्यात यश
X

मुंबईच्या गेट वे आँफ इंडिया इथे एक महिला समुद्रात पडल्याची घटना घडली. वरुन वाकून समुद्र पाहत असताना त्या महिलेचा तोल गेला आणि ती समुद्रात पडली. त्या ठिकाणी भरपूर गर्दी होती. पण गेट वे ऑफ इंडियावर फोटोग्राफीचे काम करणाऱ्या गुलाबचंद गोंड यांनी जीवाची परवा न करता थेट समुद्रात उडी मारली आणि त्या महिलेला वाचवले. गोंड यांचे वय ५० वर्षे आहे. यावेळी तिथे उपस्थित पोलीस आणि नागरिकांनी दोरी आणि ट्यूबच्या सहाय्याने या दोघांना समुद्रातून बाहेर येण्यास मदत केली.

Updated : 12 July 2021 8:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top